वावरिंकाने प्राग चॅलेंजर स्पर्धा जिंकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी अमेरिकन ओपन विजेता स्टॅन वावरिंका याने प्राग या सेकंड टायर चॅलेंजर स्पर्धेच्या जेतेपदावर मोहोर उमटवली. कोरोनामुळे तब्बल सहा महिन्यांनंतर टेनिस कोर्टवर उतरलेला स्टॅन वावरिंका मात्र स्वतःच्या कामगिरीवर खूश नव्हता. यावेळी तो म्हणाला, अजूनही माझ्या सर्वोत्तम कामगिरीनजीक पोहोचलेलो नाही. जागतिक क्रमवारीत 17व्या स्थानावर असलेल्या स्टॅन वावरिंका याने अंतिम लढतीत रशियाच्या अस्लान करातसेव याला 7-6, 6-4 अशा फरकाने पराभूत केले आणि झळाळता करंडक पटकावला. अस्लान करातसेव हा जागतिक रँकिंगमध्ये 253व्या स्थानावर आहे. दरम्यान, स्टॅन वावरिंका याने 31 ऑगस्टपासून सुरू होणाऱया अमेरिकन

पुढच्या आठवडय़ात आणखी एक स्पर्धा

तीन वेळा ग्रॅण्ड स्लॅम जिंकणाऱया स्टॅन वावरिंका याने फेब्रुवारी महिन्यानंतर टेनिस कोर्टवर पुनरागमन केले. याआधी त्याने 2017 साली जिनिवा येथे अखेरची एटीपी चॅलेंजर स्पर्धा जिंकली होती. हे त्याचे 16वे एटीपी चॅलेंजर स्पर्धेचे जेतेपद ठरले आहे. आता तो पुढल्या आठवडय़ात आणखी एका चॅलेंजर स्पर्धेत सहभागी होणार आहे.