
वेकूल फूड्स, ज्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच एआयवर आधारित आऊटग्रो नामक शेती तंत्रज्ञान आणि रियल टाईम व्यासपीठ स्थापित केले. त्यांच्याचद्वारे आज आऊटग्रो किसान प्रगती अवॉर्ड्स जाहीर करण्यात आले आहेत, ज्यांच्या माध्यमातून नैसर्गिक आणि पुन:स्थापित अशा शेतीय कल्पकता आणि उपक्रमांना सन्मानित केले जाणार आहे.
या उपक्रमाकरिता तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या विविध राज्यातून शेतकऱ्यांकडून नामांकने मागविण्यात आलेली आहेत. या पारितोषिकांच्या माध्यमातून शेतीय क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानावर आधारित कल्पकतांना प्राधान्य दिले जाईल, तसेच शेतीय पद्धतींमध्ये अगळे वेगळे कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील सन्मानित केले जाईल.
या वेळी बोलताना, आऊटग्रो ॲन्ड फार्मर एन्गेजमेंटचे प्रमुख सेन्थिल कुमार म्हणाले, “आम्ही शेतकऱ्यांचे आभार मानण्याकरिता हा पुरस्कार सुरू करतो आहोत, शेतकरी आपल्या जीवनावश्यक अन्न साखळीतील एक महत्वाचा भाग आहेत. या पारितोषिकाचा हेतू हा आपल्या देशातील शेतकरी समाजाच्या श्रम आणि बांधिलकीप्रति जाणीव म्हणून देण्यात येणार आहे. आम्हाला शेतकऱ्यांबरोबर जवळून काम करायचे आहे आणि त्यांना प्रत्येक स्तरावर मदत करायची आहे.”
आऊटग्रो प्रगती अवॉर्ड्सचे व्यासपीठ हे नैसर्गिक शेतीच्या पद्धती, शेती उपक्रमांमधील कल्पकता आणि महिला शेतकरी उद्योजिका अशा तीन श्रेणींमध्ये विभागले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी कल्पक शेतीय सवयींचा वापर होत असलेला एक व्हिडिओ आणि त्या बद्दलची माहिती रेकॉर्ड करून पाठवावी आणि त्याच्या माध्यमातून ते या पारितोषिकाकरिता योग्य का आहेत, हे देखील सांगायचे आहे.
आऊटग्रो आणि आऊटग्रो किसान प्रगती अवॉर्डबद्दल अजून माहिती हवी असल्यास आम्हाला +91-9150095207 वर संपर्क साधा आणि व्हॉट्स ॲपच्या माध्यमाने प्रवेश घ्या. आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख ही 5 ऑगस्ट 2022 आसून निकाल 25 ऑगस्ट 2022 रोजी जाहिर केले जातील.































































