
>> स्पायडरमॅन
8 जून रोजी अमेरिकन काँग्रेसला लिहिलेल्या पत्रात आयबीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरिंवद कृष्णा यांनी IBM कंपनी यापुढे त्यांच्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानावरील (Facial recognition) सर्व संशोधन थांबवत आहे आणि सध्या या तंत्रज्ञानाशी संबंधित असलेल्या सॉफ्टवेअरची विक्री देखील कंपनीतर्फे थांबवली जाणार आहे. वर्णद्वेषाच्या विरोधात कंपनीने हा निर्णय घेतला आहे. 25 मे रोजी मिनिया पोलीसमध्ये राहणाऱ्या जॉर्ज फ्लॉईड या काळ्या माणसाला पोलिसांनी ठार मारल्यामुळे अमेरिकेतील ‘ब्लॅक लाइव्हस मॅटर’ या निषेधांच्या चळवळीला सुरुवात झाली आहे. या चळवळीच्या तिसऱ्या आठवड्यातच कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निदर्शनांवर नजर ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी विविध मार्ग अवलंबित आहेत. यामध्ये विवादास्पद क्लियरव्यू सारख्या Facial recognition सॉफ्टवेअरचा देखील समावेश आहे. विवादास्पद असलेल्या या एआय सॉफ्टवेअरचा योग्य वापर करण्यास पोलीस तंत्रकुशल आणि सक्षम आहेत का नाही याविषयीच IMB ने शंका व्यक्त केली आहे. नॅशनल इन्स्टट्यूट ऑफ स्टँडड्र्स अॅण्ड टेक्नॉलॉजीच्या डिसेंबर 2019च्या अहवालानुसार अशा प्रकारच्या चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान असलेल्या सॉफ्टवेअर टूल्समध्ये बायस अल्गोरिदमचा समावेश असून, त्यामुळे भिन्न भिन्न असलेल्या वंश,लिंग किंवा वय या विविध कारणांमुळे मानवी चेहऱ्याची ओळख पटवण्यात ही सॉफ्टवेअर मोठ्या प्रमाणात अयशस्वी ठरतात. ाqक्लयरव्यूसारख्या एआय सॉफ्टवेअरमध्ये तर फेसबुक, ट्विटर आणि अगदी व्हेन्मोसारख्या वेबसाइटवरून उचललेल्या 3 अब्ज फोटोंचा डेटाबेस आहे, म्हणजे तुमचा चेहरा तुमच्या परवानगीशिवाय देखील आता या सॉफ्टवेअरच्या लॉगमध्ये दिसू शकेल. Facial recognition सॉफ्टवेअरची विक्री करणाNया इतर कंपन्याही IMB प्रमाणे जबाबदारीने वागतील याची सध्या तरी खात्री नाही. पण इतर मोठमोठ्या टेक कंपन्या या घटनेनंतर कोणतीही प्रतिक्रिया न देता गप्प बसलेल्या असताना IMB ने उचललेल्या या धाडसी पावलाचे कौतुक होताना दिसते आहे.





























































