गांजा ड्रग्ज नव्हे, तर औषधच! संयुक्त राष्ट्रांचे संशोधन, हिंदुस्थानसह 27 देशांचा पाठिंबा

गांजा हा ड्रग्ज नसून ते एक औषध असल्याचे संशोधन जागतिक आरोग्य संघटनेने केले असून संयुक्त राष्ट्र संघात या संशोधनाला मान्यता देण्यात आली. संयुक्त राष्ट्रात गांजाला हानीकारक ड्रग्जच्या यादीतून काढण्यासाठी हिंदुस्थानसह 27 देशांनी  अनुकुलता दाखवली. तर चीन, पाकिस्तानने याविरोधात मतदान केले.

गांजा हा अमली पदार्थ असून तो हानीकारक असल्याचा शिक्का मारण्यात आला आहे. मात्र गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर गांजा हानीकारक नसून ते औषध असल्याची ओळख तयार झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यासंदर्भात संशोधन केले. त्यातही गांजा औषधी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने गांजाला हानीकारक ड्रग्जच्या यादीतून काढण्याची शिफारस संयुक्त राष्ट्रांकडे केली.

आपली प्रतिक्रिया द्या