साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 6 जुलै ते शनिवार 12 जुलै 2025

>> निलिमा प्रधान 

मेष – तणावाकडे दुर्लक्ष करा

चंद्र, गुरू प्रतियुती, शुक्र, प्लुटो त्रिकोणयोग. अनेक दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभेल. प्रेरणादायक चर्चा होतील. नव्या ज्ञानाची भर पडेल. मैत्रीचे वातावरण राहील. क्षुल्लक तणावाकडे दुर्लक्ष करा. नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी वाढेल. धंद्यात वाढ, लाभ, वसुली होईल. गुंतवणूक करणारे मिळतील. राजकी, सामाजिक क्षेत्रात कलाटणी देणारी घटना घडेल. शुभ दि. 9, 10

वृषभ – प्रवासात सावध रहा

चंद्र, बुध त्रिकोणयोग, शुक्र, नेपच्यून लाभयोग. गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रवासात सावध रहा. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. कला, क्रीडा, साहित्यात मोठे यश मिळेल. नोकरीत चांगला बदल घडेल. धंद्यात सुधारणा होईल. नवे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मान, प्रतिष्ठा लाभेल. शुभ दि. 7, 8

मिथुन – योजनांना गती मिळेल

चंद्र, गुरू प्रतियुती, चंद्र, मंगळ त्रिकोणयोग. फसवण्याचा प्रयत्न होईल. सावध रहा. खाण्याची काळजी घ्या. मोह नको. नोकरीत वर्चस्व लाभेल. धंद्यात गोड बोला. नवे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज व्यक्तींचा सहवास, परिचय लाभेल. योजनांना गती मिळेल. अडचणीत आलेले काम पूर्ण करा. शुभ दि. 6, 10

कर्क – तडजोड करावी लागेल

शुक्र, प्लुटो त्रिकोणयोग, चंद्र बुध प्रतियुती. गोड बोलून कार्यभाग साधून घेण्याचा प्रयत्न करा. अहंकाराने नुकसान होईल. नोकरी टिकवा. धंद्यात नुकसान टाळता येईल. हातात असलेले काम सांभाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नेते, सहकारी यांचा मान ठेवा. तडजोड करावी लागेल. इतरांच्या सांगण्यावरून कोणताही निर्णय घेऊ नका. शुभ दि. 8, 12

सिंह – परदेश गमनाची संधी

चंद्र, शुक्र प्रतियुती, चंद्र, गुरू प्रतियुती. आत्मविश्वास वाढेल परंतु तारतम्य ठेवून भाष्य करा. अनेकांचे सहकार्य मिळेल. नोकरीत कामात वाढ होईल. परदेशगमनाची संधी मिळेल. मुलांचे सहकार्य लाभेल. धंद्यात बरकत येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कठीण, महत्त्वाची कामे करा. प्रवासात बेफिकिरी नको. शुभ दि. 6, 9

कन्या – कामाची प्रशंसा होईल

चंद्र, बुध त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र प्रतियुती. आत्मविश्वास, उत्साह वाढेल. अनेक समस्या कामे सोडवता येतील. कोर्टकेस संपवा. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. बढती मिळेल. धंद्यात नवे कंत्राट मिळेल. खरेदीविक्रीत लाभ होईल. घराचे काम होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्व वाढेल. तुमच्या कार्याचा गौरव होईल. शुभ दि. 7, 8

तूळ – खंबीर रहा

चंद्र, गुरू प्रतियुती, चंद्र, बुध त्रिकोणयोग. प्रत्येक दिवस यश देणारा, आत्मविश्वास वाढवणारा. उत्साहाचे प्रदर्शन नको. स्पर्धा करणारे टिकात्मक चर्चा करतील. भावनेच्या आहारी न जाता खंबीर रहा. प्रत्येक ठिकाणी नोकरीत, कामात प्रशंसा होईल. धंद्यात वाढ होईल. व्यवहारात फसगत होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योग्य मार्गाने जा. शुभ दि. 7, 9

वृश्चिक – अहंकार दूर ठेवा

शुक्र, प्लुटो त्रिकोणयोग, चंद्र, बुध प्रतियुती. जिद्द ठेवा. अहंकाराचे प्रदर्शन नको. मधुर वाणीने सर्वांना जिंका तरच टिकाव लागेल. नोकरीत मेहनत घ्या. चूक टाळा. धंद्यात चर्चेत यश मिळेल. कुणाचाही अवमान करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात परदेशी करारात काळजी घ्या. तुमचा फायदा घेतला जातोय का, यावर लक्ष द्या. तडजोड करा. शुभ दि. 10, 12

धनु – चर्चेत वाद होतील

चंद्र, गुरू प्रतियुती, चंद्र, मंगळ त्रिकोणयोग. सप्ताहाच्या सुरुवातीला गैरसमज, तणाव असेल. खाण्याची काळजी घ्या. तुमच्या क्षेत्रात यशाचा मार्ग मिळेल, परंतु चर्चेत वाद होईल. जवळच्या व्यक्ती नाराज होतील. नोकरीत महत्त्व टिकवाल. धंद्यात मोह टाळा. दूरदृष्टी ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा, मान वाढेल. शुभ दि. 10, 12

मकर – वाद वाढवू नका

सूर्य, चंद्र षडाष्टक योग, गुरू प्लुटो त्रिकोणयोग. राग वाढवणारे, अपमानास्पद वाटणारे भाष्य ऐकावे लागेल. संयम ठेवा. कोणताही वाद संबंध तोडू शकतो. चातुर्य वापरा. कमी बोला. तडजोड दाखवा. नोकरी टिकवा. कामात सतर्क रहा. धंद्यात कष्ट, मेहनत, कायदा सर्वत्र पाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्याशी डावपेच ठरवून समोरची व्यक्ती वागेल. शुभ दि. 6

कुंभ – महत्त्वाची कामे करा

चंद्र, मंगळ त्रिकोणयोग, चंद्र, गुरू प्रतियुती. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. कोणतेही भाष्य करताना घाई नको. तुमच्याबद्दल गैरसमज पसरवला जाईल. नोकरीमध्ये सहकारी वर्गाला समजून घ्या. रागामुळे योग्य निर्णय घेणे जमत नाही. धंद्यात आहे ती परिस्थिती सावरून घ्या. संधीची वाट पहा. शुभ दि. 7, 9

मीन – कायदा मोडू नका

चंद्र, बुध त्रिकोणयोग, चंद्र शुक्र प्रतियुती. विरोधकांना ओळखून त्यानुसार व्यक्त करा म्हणजे वाद वाढणार नाही. कायदा मोडू नका. नोकरीत सहनशीलता जाणवेल. वर्चस्व वाढेल. अहंकार नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांशी चर्चा होईल. समोरून मोठे आश्वासन मिळेल. सहकारी साहाय्य करतील. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. शुभ दि. 9, 10