साप्ताहिक राशीभविष्य : रविवार 21 ते शनिवार 27 ऑगस्ट 2022

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> निलीमा प्रधान 

मेष : नोकरीत प्रभाव पडेल

सूर्य, चंद्र लाभयोग, बुध, नेपच्युन प्रतियुती. प्रतिष्ठेत भर पडेल. कोणतेही वक्तव्य करताना काळजी घ्या. नोकरीत प्रभाव पडेल. धंद्यात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याचा विस्तार होईल. शब्द देताना घाई करू नका. कायदा पाळा. कुटुंबात खर्च होईल. नाराजी वाढू देऊ नका.   शुभ दिनांक : 21, 22

वृषभ : अधिकार प्राप्ती होईल

चंद्र, गुरू त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र युती. प्रत्येक दिवस महत्त्वाचा ठरेल. कार्यतत्परता उपयुक्त ठरेल. नोकरीत हलगर्जीपणा नको. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या समवेत मुद्दे मांडताना नम्रता ठेवा. अधिकार प्राप्ती होईल. कुटुंबातील कामे होतील. खरेदी-विक्रीत लाभ होईल.   शुभ दिनांक : 22,23

मिथुन : रागावर ताबा ठेवा

सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, शुक्र युती. रागावर ताबा ठेवा. प्रवासात सावध रहा. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. धंद्यात प्रगतीकारक निर्णय होईल. जुने येणे वसूल करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे डावपेच यशस्वी होतील. कुणालाही कमी लेखू नका. तुमच्या विरोधात कारवाया चालू आहेत.  शुभ दिनांक : 24, 25

कर्क : येणे वसूल करा

बुध, प्लुटो त्रिकोणयोग, सूर्य, चंद्र लाभयोग. अडचणीत आलेली कामे होतील. आरोपांना उत्तर देता येईल. नोकरी धंद्यात वाढ होईल. मागील येणे वसूल करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनेनुसार कार्य करा. गैरसमज संपवा. तुमचे स्थान, नावलौकिक वाढवा. तुमच्या क्षेत्रात अग्रेसर राहाल.  शुभ दिनांक : 21, 25

सिंह : धंद्यात मोह नको

चंद्र, बुध लाभयोग, बुध, नेपच्युन प्रतियुती. अडचणी कमी होतील. तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न होईल. भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ घालून निर्णय घ्या. धंद्यात मोह नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिलासा देणारी बातमी मिळेल. जवळच्या व्यक्ती तुमच्या स्वभावाचा फायदा घेतील.   शुभ दिनांक : 21, 22

कन्या : वाद वाढवू नका

बुध, प्लुटो त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र युती. क्षुल्लक कारणावरून वाद वाढवू नका. प्रतिष्ठा धोक्यात घालू नका. नोकरी टिकवा. धंद्यात अरेरावी नको. फायदा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नकळत कामात चूक होईल. बेसावध राहू नका. योग्य सल्ला घ्या. प्रकृतीची काळजी घ्या.   शुभ दिनांक : 21, 22

तूळ : विचारपूर्वक वागा

सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, शुक्र युती. कोणालाही आश्वासन देताना काळजी घ्या. नोकरी-धंद्यात प्रभाव वाढेल. जुने येणे वसूल करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चर्चा करताना विचारपूर्वक वागा. प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. रागावर ताबा ठेवा. प्रवासात घाई नको. कुटुंबात महत्त्वाची घटना घडेल.   शुभ दिनांक : 22, 23

वृश्चिक : ठरवलेले काम कराल

चंद्र, बुध लाभयोग, चंद्र, शुक्र युती. आठवडय़ाच्या सुरूवातीला तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होईल. नोकरीत वरीष्ठांना खूष कराल. दिग्गज लोकांचे परिचय होतील. आर्थिक साहाय्य मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात ठरवलेले काम कराल. मानसन्मान मिळेल. आघाडीवर राहाल.    शुभ दिनांक : 21, 25

धनु : अनाठायी खर्च टाळा

सूर्य, चंद्र लाभयोग, बुध, प्लुटो त्रिकोणयोग. तुमच्या प्रगतीचा मार्ग तुमच्यासाठी खुला होईल. प्रतिस्पर्धी गुप्त कारवाया करतील. नोकरीत काम वाढेल. मैत्रीत गैरसमज होतील. महत्त्वाची वस्तू जपा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्याकडे जबाबदारी देण्यात येईल. अनाठायी खर्च टाळा. मनस्ताप होईल.  शुभ दिनांक :  22, 23

मकर : चौफेर सावध रहा

बुध, प्लुटो त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र युती. अडचणी वाढतील. चौफेर सावध रहा. कोणत्याही निर्णयाची घाई करू नका. नोकरी टिकवा. व्यवसायात सावध रहा. प्रकृतीची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे प्रभावी असले तरी, तुमच्यावर आरोप येतील. परिचय वाढतील. कुटुंबात चांगल्या गोष्टी घडतील.   शुभ दिनांक : 21, 25

कुंभ : प्रसंग पाहून व्यक्त व्हा

सूर्य, चंद्र लाभयोग, बुध, प्लुटो त्रिकोणयोग. धोक्यात आलेली प्रतिष्ठा सावरली जाईल. मात्र कोणतेही विधान धाडसी वृत्तीने, बेफिकीरीने करू नये. नोकरीत वर्चस्व वाढेल. धंद्यात उधारी नको.  राजकीय, सामाजिक क्षेत्रात मानसन्मान देणारी घटना घडेल. जवळच्या व्यक्तींपासून सावध रहा. कुटुंबात खर्च वाढेल.     शुभ दिनांक : 22, 23

मीन : अहंकारी वृत्ती नको

चंद्र, बुध लाभयोग, चंद्र, शुक्र युती. अहंकारी वृत्तीने वागू नका. तुमच्या कार्याला गती मिळेल. कठीण प्रसंगावर बुद्धिचातुर्याने मात करा. नोकरी टिकवा. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चर्चा चांगल्या प्रकारे होईल. वरिष्ठांना कमी लेखू नका. कला, क्रीडा, साहित्यात पुढे जाल.   शुभ दिनांक ः 15, 20