
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेती हिंदुस्थानची वेटलिफ्टर सीमा डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळली आहे. राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्थेने (नाडा) तिच्यावर शनिवारी चार वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. सीमाने 2017 सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती.
‘नाडा’ने याच वर्षी विशाखापट्टणममध्ये झालेल्या 34 व्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान सीमाची डोप टेस्ट घेतली होती. सीमाच्या रक्ताच्या नमुन्यात हाइड्रोक्सी 4 मिथॉक्सी टेमोक्सीफेन, सलेक्टिव एस्ट्रोजन रिसेप्टर मॉडय़ूलर मेटेनोलोन, एनाबोलिक स्टेरॉयड ओस्टारीन, सलेक्टिव ऍण्ड्रोजन रिसेप्टर मॉडय़ूलर ही उत्तेजके आढळली आहेत. हे सर्व पदार्थ ‘वाडा’च्या प्रतिबंधित यादीतील आहेत.




























































