
कॅरम या खेळाचा देशात प्रसार आणि प्रचार करण्यासाठी कोलकाताहून देबर मोंडल आणि अग्नी बाग हे दोन कॅरमप्रेमी बंगाली युवक सायकलने उद्या मंगळवारी 14 डिसेम्बरला मुंबईत येत आहेत. 2300 मैलांचा दीर्घ प्रवास सायकलने करून मुंबईत येणाऱया या युवकांचे जंगी स्वागत महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने आणि शिवाजी पार्क जिमखान्याच्या सहकार्याने शिवाजी पार्क, दादर येथे सायंकाळी 5 वाजता करण्यात येणार आहे.
हे युवक मुंबईत विश्वविजेता कॅरमपटू प्रशांत मोरेसह अन्य दिग्गज कॅरमपटूची भेट घेणार आहेत. कॅरमशौकिनांनी या कार्यक्रमास कोरोना प्रतिबंधक नियम पाळुन उउपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष अरुण केदार यांनी केले आहे.



























































