ममता बॅनर्जींवर टीका करणे बंद करा! भाजपाला घरचा आहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर भाजपाकडून सतत होणाऱया टीकेमुळे भाजपातूनच विरोधी सूर उमटू लागला आहे. ‘भाजपाने ममता बॅनर्जींवर टीका करणे बंद करावे’ असा घरचा आहेर भाजपा खासदार मुकुल रॉय यांचे पुत्र शुभ्रांशू रॉय यांनी दिला आहे.

मुकुल रॉय यांनी निवडणुकीपूर्वीच तृणमूल काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता. आता त्यांच्याच घरातून ममता बॅनर्जींचे समर्थन सुरू झाले आहे.