
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक जवळ येत असताना केंद्रातील मोदी सरकार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकार यांच्यातील संघर्ष पेटला आहे. मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना हजर राहण्याची नोटीस पेंद्रीय गृह मंत्रालयाने बजावली. परंतु कोरोनामुळे दिल्लीत येता येणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत ममता सरकारने सुनावले आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका आमदाराने पक्ष सोडला. 24 तासांत भाजपने तृणमूलचे तीन आमदार पळविले आहेत.
काही दिवसांपूर्वी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या गाडय़ांच्या ताफ्यावर कोलकातानजीक दगडफेक झाली. हा हल्ला तृणमूल काँग्रेसने केल्याचा आरोप पेंद्र सरकारने केला. तर, निवडणुकीच्या तोंडावर भाजपनेच हा हल्ला घडवून आणल्याचा पलटवार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा भाजप नेत्यांना दिलासा
पश्चिम बंगाल सरकारने भाजप नेत्यांवर दाखल केलेल्या गुह्यांसंदर्भात पुढील सुनावणी होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले. भाजप नेते पैलास विजयवर्गीय, अर्जुन सिंह, पवन सिंह, सौरभ सिंह, मुपुल रॉय आणि कबिर शंकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपल्याविरुद्ध दाखल केलेले फौजदारी गुन्हे हे राजकीय सूडापोटी दाखल केल्याचे या नेत्यांनी याचिकेत म्हटले आहे.
























































