
सामना ऑनलाईन । मुंबई
दूध उत्पादक शेतकऱ्याला प्रति लिटर ५ रुपये अनुदान मिळावं या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत राज्यभरात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनामुळे मुंबईकरांना कपामध्ये कोरा चहा मिळू नये म्हणून गुजरातचे दूध रेल्वेने आणण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने ५९४४० अहमदाबाद-मुंबई सेंट्रल या पॅसेंजर ट्रेनला दुधाचे कंटेनर जोडण्याची परवानगी दिली आहे. दुपारच्या सुमारास ही रेल्वे मुंबईकडे रवाना करण्या आली.
महाराष्ट्र में दूध की आपूर्ति रोकने संबंधी आंदोलन के मद्देनज़र आम जनता की सुविधा के लिए पश्चिम रेलवे द्वारा 59440 अहमदाबाद-मुंबई सेंट्रल पैसेंजर से अगले कुछ दिनों में मुंबई के लिए 44000 लीटर क्षमता प्रत्येक के 12 मिल्क कंटेनर लाने की विशेष अनुमति दी गई है। pic.twitter.com/BNgqZTdDTV
— Western Railway (@WesternRly) July 17, 2018
राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनामुळे मुंबईत दुधाची वानवा निर्माण होण्याची शक्यता असून दोन दिवस पुरेल इतकाच साठा मुंबईकरांच्या फ्रिजमध्ये असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे मुंबईत दूध टंचाईची समस्या निर्माण होऊ नये यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. ५९४४० अहमदाबाद-मुंबई सेंट्रल या पॅसेंजर ट्रेनला ४४ हजार लीटर क्षमतेचे प्रत्येकी १२ दुधाचे कंटेनर जोडण्यात येणार आहेत. पुढच्या काही दिवसांसाठी पश्चिम रेल्वेने ही परवानगी दिली आहे.
दूध प्रश्नावरून धस आणि मुंडे यांच्यात जुंपली, कामकाज तहकूब झाल्यानंतरही बाचाबाची
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही सुरू होते. सोमवारी सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे तसेच अमरावती येथे स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी दुधाचे टँकर फोडून दूध रस्त्यावर ओतले होते.






























































