
पश्चिम रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनने मे ते 26 नोव्हेंबर दरम्यान लांबपल्ल्यांच्या गाड्या आणि उपनगरीय लोकलमधून विनातिकीट प्रवाशांविरोधात राबविलेल्या मोहिमेत एकूण 25,900 हून अधिक गुन्हे दाखल करीत 1.04 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. मे महिन्यापासून ते 26 नोव्हेंबर 2020 दरम्यान राबविलेल्या मोहिमेत 25,982 केसेस दाखल होऊन दंड म्हणून 1.04 कोटी रुपये वसूल केले आहे. या 25,982 केसेस पैकी 19,172 केसेस उपनगरीय प्रवाशांविरोधात दाखल केल्या आहे.

























































