रेल्वे प्रवाशांनो, कृपया इथे लक्ष असू द्या! पश्चिम मार्गावर रविवारी 5 तासांचा जम्बोब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांनो, येत्या रविवारी रेल्वेरूळ, सिग्नल यंत्रणा आणि इतर देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी पश्चिम मार्गावर पाच तासांचा जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गावर सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेने पत्रकाद्वारे दिली आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन फास्ट मार्गावरील सर्व लोकल सांताक्रुझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरून चालवल्या जातील. बोरिवलीहून सुटणाऱ्या सर्व लोकल गोरेगावपर्यंत सुरु राहतील. तसेच काही गाड्या रद्द राहतील.