
कोणताही फोन वापरताना त्यात सिमकार्ड हवे असते. फोन बदलल्यानंतर कधीकधी सिम कार्ड खराब होते. जर तुमचे सिमकार्ड खराब झाले असे तुम्हाला वाटत असेल तर काय कराल.
सर्वात आधी ज्या फोनमध्ये सिम कार्ड टाकलेले आहे. तो फोन रिस्टार्ट करून पाहा. जर समस्या सुटली नसेल तर ते सिमकार्ड दुसऱया फोनमध्ये टाकून पाहा.
सिमकार्ड खराब झाले आहे की नाही हे स्पष्ट होईल. धूळ किंवा घाण साचली असेल तर सिमकार्ड काम करणे थांबवू शकते. त्यामुळे हळूवारपणे कोरडय़ा कापडाने त्याला स्वच्छ करा.
जर हे सगळे करूनही तुमचे सिमकार्ड व्यवस्थित काम करत नसेल तर तुम्ही ज्या कंपनीचे सिमकार्ड आहे त्याच्या जवळच्या स्टोअरला जाऊन भेट द्या आणि सविस्तर माहिती द्या.
कंपनीच्या स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला नवीन सिमकार्ड बदलून मिळेल. त्यासाठी तुम्हाला तुमचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र दाखवावे लागेल.