
रेशन कार्ड हे आधार कार्ड आणि पॅनकार्डइतकेच महत्त्वाचे आहे. रेशन कार्डचा वापरही अनेक ठिकाणी सर्रास केला जातो. त्यामुळे रेशन कार्ड आणि त्यात कुटुंबाची नावे असणे गरजेचे आहे.
जर कदाचित चुकून घरातील रेशन कार्ड हरवले तर काय करावे, असा अनेकांना प्रश्न पडतो. तर सर्वात आधी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
वेबसाइटवर ‘रेशन कार्ड सेवा’ किंवा ‘डुप्लिकेट रेशन कार्डसाठी अर्ज’ असा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा. ऑनलाइन फॉर्म डाऊनलोड करा .
अर्जासोबत आवश्यक आधार कार्ड, पॅन कार्ड आणि हरवल्याचे शपथपत्र जोडा. सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करा आणि संदर्भ क्रमांक नोंदवून घ्या.
ऑनलाइन शक्य नसेल तर तुमच्याजवळील संबंधित विभागीय कार्यालयात जा. डुप्लिकेट रेशन कार्डसाठी अर्ज घ्या आणि सर्व आवश्यक माहिती भरा. शपथपत्र जोडून अर्ज सादर करा.
























































