असं झालं तर… गृहकर्जाचा हप्ता चुकला…

गृहकर्जाचा हप्ता चुकल्यास तात्काळ बँकेशी संपर्क साधा. तुमच्या आर्थिक अडचणींबाबत बँकेला माहिती द्या. त्यामुळे बँक तुमच्यावर लगेच कठोर कारवाई करत नाही.

सामान्यतः बँक एक रिमाइंडर पाठवते. दंड भरून तुम्ही कर्ज पुन्हा नियमित करू शकता. मात्र सलग तीन हप्ते थकल्यास बँक मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू करू शकते.

शक्य तितक्या लवकर थकलेले हप्ते भरून कर्ज नियमित करा; अन्यथा तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो आणि बँक कायदेशीर कारवाई करू शकते.

मालमत्ता जप्ती हा बँकेचा शेवटचा पर्याय असतो. त्याआधी बँक तुमच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करते.

बँकेकडून नोटीस येण्याची वाट पाहू नका. कर्जदार म्हणून तुमची मालमत्ता गमावण्याचा धोका असतो. त्यामुळे वेळेवर हप्ते भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे.