
व्हॉट्सऍप ग्रूपच्या ऍडमिनला आता जादा पॉवर मिळणार आहे. व्हॉट्सऍप सध्या एका नव्या कम्युनिटी फीचरवर काम करत आहे. यामुळे ऍडमिन ग्रूपमध्येही ग्रूप बनवू शकतो. तसेच ऍडमिनला ग्रुप इन्व्हिटेशन लिंक किवा क्यूआर कोड पाठवून नव्या युजर्सला आमंत्रित करता येईल.
यामध्ये दुसरे युजर्स जॉईन होऊ शकतात. म्हणजेच युजर्स एका लिंकद्वारे ग्रुपमध्ये येऊ शकतील. तसेच ग्रुपचे मेसेज शेअर करण्यासाठी आणखी एक चॅनेल मिळणार आहे. ग्रुप ऍडमिनला अधिक मजबूत करणारे हे फीचर व्हॉट्सऍपच्या बीटा व्हर्जनवर दिसले आहे. कंपनीने अधिकृतपणे या फीचरची अद्याप घोषणा केलेली नाही.



























































