अॅण्ड्रॉईडवरून आयफोनवर चॅट होणार ट्रान्सफर

अॅण्ड्रॉईड फोन वापरणाऱया एखाद्या युजरने आयफोन घेतला तर ते युजर आपली व्हाट्सअॅपवरील चॅटिंग हिस्ट्री गमावतात. मात्र व्हाट्सअॅप सध्या एका खास फिचरवर काम करीत आहे. ज्यामुळे ऑपरेटिंग सिस्टम स्वीच करणाऱया ग्राहकांना काहीच अडचण येणार नाही.

डब्ल्यूएबेटा इन्फोच्या मते व्हाट्सऍप चॅट हिस्ट्री मायग्रेशन फिचरची चाचणी करीत आहे. जे युजर्सना अॅण्ड्रॉईडवरून आयओएस व आयओएसवरून अॅण्ड्रॉईडवर मूळ चॅट हिस्ट्रीचे ट्रान्सफर करण्यासाठी परवानगी देईल. त्यामुळे व्हाट्सअॅप प्लससारख्या थर्ड-पार्टी ऍप्सची आवश्यकता भासणार नाही. चॅट ट्रान्सफर करण्यासाठी व्हाट्सऍपच्या लेटेस्ट व्हर्जनची आवश्यकता असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या