Whatsapp च्या ‘लास्ट सीन’मध्ये नवीन पर्याय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हॉट्सऍपवर आता ‘लास्ट सीन’ संबंधित अजून एक नवीन फीचर सादर केले जाणार आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सऍपवर आता लास्ट सीनच्या सेटिंगमध्ये युजर्सना ‘माय काँटॅक्ट एक्सेप्ट’ असा एक नवीन ऑप्शन बघायला मिळणार आहे. आतापर्यंत या प्रायव्हसी सेटिंगमध्ये ‘एव्हरीवन’, ‘माय काँटॅक्ट’आणि ‘नोबडी’ असे तीन पर्याय मिळत होते. आता लास्ट सीन सेटिंगमध्ये ‘माय कॉण्टॅक्ट ऍक्सेप्ट’ ऑप्शन मिळाल्यानंतर युजर्स आपले व्हॉट्सऍप लास्ट सीन कोणाला दाखवायचे आणि कोणाला नाही हे ठरवू शकतात.