व्हाट्सअपने घेतला मोठा निर्णय, एकाचवेळी मेसेज फॉरवर्ड करण्याची मर्यादा घटवली

1938

कोरोना विषाणू जगभरात थैमान घालत असताना सोशल मीडियावर अफवांना पेव फुटले आहे. याचमुळे कोट्यवधी युजर्स असणाऱ्या व्हॉट्सअपने मोठा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअपने मेसेज फॉरवर्ड करण्याची मर्यादा कमी केली आहे. युजर्सला आता एक मेसेज एकाचवेळी फक्त एका ग्रुप किंवा व्यक्तीला शेअर करता येणार आहे, याआधी एकाचवेळी पाच जणांना मेसेज फॉरवर्ड करता येत होता. परंतु हे फिचर व्हॉट्सअप अपडेट केल्यानंतर ऍक्टिव्ह होणार आहे.

कोरोना विषाणूमुळे जगभरात 70 हजार लोकांचा बळी गेला असून 12 लाख लोकांना याची लागण झाली आहे. मृतांचा आकडा वाढत असताना याबाबत सोशल मीडियावर भ्रमित करणारे चुकीचे मेसेजही व्हायरल होत आहे. खोटे फोटो, व्हिडीओ आणि चुकीच्या बातम्या किंवा उपचार पद्धतीबाबत खोटी माहिती फॉरवर्ड होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचमुळे फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअपने मेसेज फॉरवर्ड करण्याची मर्यादा घटवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता एकाचवेळी एकालाच मेसेज फॉरवर्ड करता येणार आहे.

जगभरात व्हॉट्सअपचे 2 अब्ज युजर्स आहेत तर हिंदुस्थानात ही संख्या 40 कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे व्हॉट्सअपने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या