
व्हॉट्सऍपचे चॅटिंग मजेशीर व्हावे, म्हणून कंपनी नवनवीन फिचर आणते. सध्या व्हॉट्सऍप कंपनी अशाच एका भन्नाट फिचरवर काम करत आहे. त्यामुळे एका व्हॉट्सऍप अकाऊंटचा वापर चार ठिकाणी करता येईल.
मल्टी डिव्हाईस असे या फिचरचे नाव असून युजर्ससाठी ते फायदेशीर आहे. सध्या तरी हे फिचर व्हॉट्सऍपच्या आयओएस बीटा वर्जनवर उपलब्ध आहे. लवकरच ते अँड्रॉईड फोनमध्ये उपलब्ध होऊ शकते. मल्टी डिव्हाईस फिचरच्या माध्यमातून एकाचकेळी अनेक डिव्हाईसवर एका अकाऊंटचा वापर करता येणार आहे.
डब्ल्यूएबेटाइन्फोने दिलेल्या माहितीनुसार आयओएस बीटामध्ये लॉगआऊट फिचर आहे. हे फिचर मल्टी डिव्हाईस सपोर्टचा भाग असेल. एक युजर विविध ठिकाणी कनेक्टेड डिव्हाईसशी लॉगआऊट करू शकणार आहे
































































