व्हॉट्सअॅप बॅकफूटवर! 8 फेब्रुवारीपासून कोणत्याही युजरचे अकाऊंट बंद होणार नाही

नव्या पॉलिसीवरून युजरमध्ये पसलेली नाराजी आणि प्रायव्हसीवरून संशयाचे वातावरण यामुळे व्हॉट्सअॅपने अखेर माघार घेतली आहे. तूर्ताल प्रायव्हसी पॉलिसी पुढे ढकलण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे8 फेब्रुवारीपासून कोणत्याही युजरचे अकाऊंट बंद होणार नाही, अशी माहिती आज कंपनीच्यावतीने सोशल मिडियावरून देण्यात आली आहे. त्यामुळे जगभरातील कोटय़वधी युजर्सना दिलासा मिळाला आहे.

नववर्षाच्या सुरुवातीला व्हॉट्सअॅपने नवीन प्रायव्हसी पॉलिसी जाहीर करत जगभरातील कोटय़वधी युझर्सना धक्का दिला होता. त्यानुसार, नवीन पॉलिसी मान्य न केल्यास 8 फेब्रुवारी 2021 पासून व्हॉट्सअॅप अकाऊंट बंद होईल, असा इशारा देण्यात आला होता. मात्र, यानंतर जगभरातील युझर्सनी या नवीन प्रायव्हसी पॉलिसीला जोरदार विरोध केला होता. अनेक युजर्सनी व्हॉट्सअॅपला पर्याय म्हणून सिग्नल, टेलिग्रामसारख्या अॅपला पसंती दिल्याचे पाहायला मिळाले. अखेर पॉलिसीवरून चौफेर होणारी टीका आणि विरोधानंतर व्हॉट्सअॅपने आता एक पाऊल मागे घेत नवीन प्रायव्हसी पॉलिसी लागू करण्याचा निर्णय तूर्तास पुढे ढकलला आहे.नवीन पॉलिसीबाबत काही दिवसांपूर्वीच कंपनीने स्पष्टीकरण दिले होते. तुमचे प्रायव्हेट चॅटिंग पूर्णपणे सुरक्षित असून तुमच्या प्रायव्हसीला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. नवीन पॉलिसी ही बिझनेस अकाऊंट डोळ्यासमोर ठेवून बनवली आहे, असे कंपनीने म्हटले होते.
युजरमधील गैरसमज दूर करणार!

पॉलिसीवरून माघार घेण्याच्या निर्णयाची घोषणा करताना व्हॉट्सअॅपने म्हटलंय, नवीन प्रायव्हसी पॉलिसी मान्य करण्यासाठी दिलेली मुदत मागे घेत आहोत. 8 फेब्रुवारी 2021 रोजी कोणत्याही युझरचे अकाऊंट बंद, डिलीट करण्यात येणार नाही. व्हॉट्सअॅप गोपनियता आणि सुरक्षेवर कशापद्धतीने काम करते, याविषयी स्पष्टता आणणार आहोत. चुकीची माहिती आणि युजरमध्ये पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 15 मे 2021 रोजी व्यावसायिक पर्याय उपलब्ध करण्यापूर्वी नवीन प्रायव्हसी पॉलिसीबद्दल जाणून घेण्यासाठी हळूहळू युजरपर्यंत पोहोचणार आहोत, असे व्हॉट्सअॅपने आज स्पष्ट केले आहे.

विद्याचा नटखट ऑस्करच्या शर्यतीत!

बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचा पहिलावहिला लघुपट ’नटखट’ ऑस्करच्या शर्यतीत पोहोचला आहे. आरएसव्हीपीने त्यांच्या ट्विटर अकाऊंद्वारे ही माहिती देत नटखटला ऑस्कर 2021 मध्ये सर्वोत्कृष्ट लघुपट विभागात नामांकन मिळाल्याचे सांगितले आहे. रॉनी स्क्रुवाला आणि विद्या बालन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून शान व्यास यांनी दिग्दर्शन केले आहे. 33 मिनिटांचा हा लघुपट समाजात असलेली पितृसत्ताक पद्धती, लिंगभेद, बलात्कार, घरगुती हिंसा आदी मुद्दय़ांवर भाष्य करतो. अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात या चित्रपटाचे स्क्रिनिंग झाले असून बेस्ट ऑफ इंडिया शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये नटखटला पुरस्कार मिळाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या