
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर याच्या सर्वाधिक चर्चा झालेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘कभी खुशी-कभी गम’ हा आहे. या चित्रपटातील समधुर गाणी आजही चाहत्यांच्या जिभेवर रेंगाळत असतात. या चित्रपटातील गाजलेल्या गाण्यापैकी एक म्हणजे ‘सूरज हुआ मध्धम, चाँद ढलने लगा…’ या गाण्याच्या शूटिंगवेळी एक अशी घटना घडली होती.
पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘सूरज हुआ मध्धम, चाँद ढलने लगा’, या गाण्याचे शूटिंग इजिप्तमध्ये सुरू होते. शुटिंगसाठी ‘कभी खुशी-कभी गम’ चित्रपटातील स्टार शाहरूख खान आणि काजोलही इजिप्तमध्ये होते. ‘आम्ही इजिप्तमध्ये गाण्याचे शूटिंग करत होते त्यावेळी मला जुलाबाचा त्रास झाला होता. आम्ही त्यावेळी अशा ठिकाणी शूटिंग करत होतो की त्या ठिकाणी कोणतीही सुविधा नव्हती. सगळीकडे फक्त दगड आणि दगड होते. त्यावेळी एका दगडामागे जाऊन सर्व कार्य उरकले होते’, असे करण जोहरने सांगितले.
तसेच करण पुढे म्हणाला की, ‘या कामासाठी मी खूप लांब गेलो होतो. त्याठिकाणी माझ्यासारखीच समस्या झालेला एक व्यक्ती मला भेटला होता. तो एका दुसऱ्या दगडामागे बसलेला होता. परंतु आम्ही एकमेकांना दिसत होतो. आम्ही एकमेकांना पकडले होते. आम्ही लपवण्याचा प्रयत्न करत होतो. ती वेळ आतापर्यंत माझ्या जीवनातील सर्वात लाजीरवाणी होती.’
पुढे करण म्हणाला की, ‘तो व्यक्ती सातत्याने माझ्याकडे पाहात होता. मला अतिशय अवघडल्यासारखे झाले आणि मी आता मरणार असे वाटत होते. मी त्यावेळी ही गोष्ट कोणालाही सांगण्याच्या स्थितीत नव्हतो. परंतु खरंच खूप वाईट जुलाब झाले होते. आमची व्हॅनिटी व्हॅनही शूटिंग स्थानापासून २ किलोमीटर लांब होती. ही गोष्ट माझ्या काय लक्षात राहील’, असेही करण म्हणाला.



























































