सरकार बदलल्यावर नोकरशहांच्या वर्तनात बदल होतो!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात ‘सरकार बदलल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बोलण्याच्या आणि भेटण्याच्या पद्धतीत लगेचच फरक दिसून येतो. जोपर्यंत राज्यात तुमचे सरकार असेल तोपर्यंत प्रशासकीय अधिकारी एखाद्या नोकराप्रमाणे तुमच्या मागे-पुढे फिरतात’, हे सांगताना भाजप नेत्या उमा भारती यांनी लालूप्रसाद यादव यांच्याबाबतीत घडलेला एक किस्सा सांगत आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण केले. मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी ‘नोकरशाही’ संबंधात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची जोरदार झोड उठली आहे. या वादानंतर उमा भारती यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. नोकरशाहीबद्दल बोलताना भावनेच्या भरात मी भाषेवर संयम गमावल्याचे माझ्या लक्षात आले; परंतु माझ्या भावना अगदी योग्य होत्या, असेही उमा भारती यांनी म्हटले आहे. सोबतच त्यांनी देशभरातील नोकरशहांना आवाहन करताना चार समजुतीचे शब्दही सांगितले आहेत.