
सध्या देश कोविड-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेशी मुकाबला करत आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानूसार तंबाखू वापरामुळे लोकांना कोविड-19 ची बाधा झाल्यास गंभीर फुफ्फुसाचे आजार, मधुमेह, हृदयरोग, आणि कर्करोग यांचे गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तंबाखूचा धोका कमी करणे आणि त्याचे आरोग्यावरील धोक्यांचे प्रात्यक्षिक दाखवणे यासाठी, महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाने 30 सेकंदाची पूर्व-परीक्षण केलेली सार्वजनिक सेवा घोषणा (PSA) ‘व्हेन यू क्विट’ ची सुरूवात राज्यस्तरीय तंबाखू नियंत्रण मास मीडिया मोहिमेचा भाग म्हणून केली आहे.
ही मोहिम टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि जागतिक आरोग्य संघटना व्हायटल स्ट्रॅटिजीज यांच्या तांत्रीक सहाय्याने करण्यात आली आहे. PSA ची रचना सिगारेट किंवा बिडी ओढणे आणि कोविड-19 सह हृदयरोग यांमधील संबंधांवर भर देते. ती तंबाखूचे सेवन करणाऱ्यांना तंबाखू सोडण्याचे आणि मदतीसाठी राष्ट्रीय तंबाखू क्विट लाईन (1800-11-2356) ला कॉल करण्यासाठी प्रोत्साहन देते. ही मोहिम तीन आठवड्यांच्या कालावधीसाठी राज्यात राबवण्यात येणार आहे. टीव्ही चॅनल आणि रेडियोवर ही मराठीमध्ये प्रसारीत करण्यात येईल. ती फेसबुक, हॉटस्टार,वूट, झी 5, सोनी लाईव्ह आणि एणएक्स प्लेयर यांसारख्या मोठ्या डिजीटल ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर सुद्धा दाखवली जाईल.
“व्हेन यू क्विट” ही मोहिम व्हायटल स्ट्रॅटिजीजकडून विकसीत आणि पूर्वतपासणी झालेली आहे. प्रतिसादकर्त्यांना पीएसए समजण्यास सोपी आहे. ती बघून झाल्यावर ते धुम्रपान बंद करण्याचा प्रयत्न करतात आणि धुम्रपान बंद केल्यावर हळुहळू त्यांच्या आरोग्यात सुधारणा होते, अशी नोंद करण्यात आली आहे. धुम्रपान बंद केल्यावर वापरकर्त्यांना होणाऱ्या लाभाचे चित्रण त्यात आहे. यावर्षीच्या जागतिक तंबाखू विरोधी दिनासाठी – ‘बंद करण्यासाठी वचनबद्ध’ या जागतिक आरोग्य संघटनेच्या विषयावर अखंडपणे भर देत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास म्हणाले, “आम्ही महाराष्ट्रात तंबाखूचा धोका कमी करण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि प्रगती केली जात आहे. शासनाने नुकतेच खुल्या सिगारेटच्या विक्रीवर निर्बंध लावण्यासाठी महत्वपूर्ण पावले उचलली आहेत, त्यामुळे युवकांकडून होणाऱ्या त्याच्या वापरावर नियंत्रण आले आहे. तंबाखूचे धोके सांगणे आणि लोकांना तंबाखू सोडण्यासाठी उद्युक्त करणे यांसाठीचे मास मीडिया मोहिम हे महत्वपूर्ण पाऊल आहे.”
मोहिमेच्या स्त्रोतांचा लाभ घेण्यासाठी, कृपया संपर्क करा: https://www.vitalstrategies.org/resources/
Link of PSA: https://drive.google.com/file/d/1NRbHgZ8o2XkKKrX6OxHu4PssCw5Ux-IW/view?usp=sharing


























































