
हिवाळा आल्यावर आपल्या आहारात गरम पदार्थांचा समावेश करणे खूप गरजेचे असते. तीळ हे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. बाजारात उपलब्ध असणारे दोन प्रकारचे तीळ हे आपल्याला माहीत आहेत. काळे आणि पांढरे तीळ. पोषणतज्ञ म्हणतात की, पांढरे आणि काळे तीळ हे दोन्ही आपल्यासाठी फायदेशीर आहेत. काळे तीळ साल न काढता खाल्ले जातात. त्यांची साले अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजांनी समृद्ध असतात. त्यात लोह, मॅग्नेशियम, जस्त आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात.
काळे तीळ खाण्याचे फायदे
हिमोग्लोबिनची कमतरता असणाऱ्यांनी काळे तीळ खाणे सर्वात उत्तम मानले जाते. काळे तीळ आहारात समाविष्ट केल्याने, केस गळणे कमी करते आणि केसांच्या वाढीस मदत करते.
कमी लोह पातळी, पीसीओएस आणि अशक्तपणा असलेल्या महिलांसाठी काळे तीळ विशेषतः फायदेशीर आहेत. काळे तीळ हिवाळ्यात उबदारपणा आणि शक्ती प्रदान करतात.
पांढरे तीळ
पांढरे तीळ सोललेले असतात, त्यामुळे त्यांचा पोत मऊ असतो. पांढरे तीळ हे पचनास हलके असतात. पांढऱ्या तीळामध्ये कॅल्शियम, निरोगी चरबी आणि हाडांना अनुकूल खनिजे असतात.
पांढरे तीळ खाण्याचे फायदे
पांढऱ्या तीळामध्ये कॅल्शियमची मात्रा ही सर्वाधिक असल्याने, हे तीळ हाडे आणि दातांच्या मजबूतीसाठी फार उत्तम मानले जातात.
पांढऱ्या तीळामधील कॅल्शियम लहान मुले, वृद्धांसाठी फायदेशीर मानला जातो.
पांढरे आणि काळे दोन्ही तीळ पौष्टिकतेने समृद्ध असतात आणि त्यांचे स्वतःचे फायदे आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार निवड करु शकता.
आहारात लोणचे समाविष्ट करण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या
तुम्हाला शरीरातील लोह वाढवायचे असेल, थकवा दूर करायचा असेल आणि केसांची वाढ वाढवायची असेल तर काळे तीळ खा.
पांढरे तीळ खाणे कॅल्शियमची पातळी वाढवण्यासाठी, हाडे मजबूत करण्यासाठी आणि त्वचा आणि महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.




























































