बोर्डाच्या परीक्षांचे पर्यवेक्षण कोण करणार? परीक्षा केंद्रे वाढल्याने शिक्षकांची टंचाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एप्रिलमध्ये होणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक शिक्षकांना निवडणूक डय़ुटी लावल्याने शाळा आणि ज्युनियर कॉलेजमध्ये सध्या शिक्षकांची कमतरता भासत आहे. शिक्षकांना मतदार याद्या तयार करण्याच्या कामांना जुंपल्याने दहावी, बारावीच्या लेखी परीक्षांचे पर्यवेक्षण कोण करणार, असा प्रश्न आता शाळांसमोर उभा राहिला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा होत असल्याने सोशल डिस्टिन्सिंगचे नियम पाळण्यासाठी यंदा परीक्षा पेंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. शाळा तिथे परीक्षा पेंद्र असल्याने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्याला तो शिकत असलेल्या शाळा किंवा ज्युनियर कॉलेजमध्येच परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे यंदा मोठय़ा प्रमाणावर पर्यवेक्षणासाठी शिक्षक, सहाय्यक शिक्षकांची गरज भासणार आहे. मात्र परीक्षा सुरू होण्याआधीच शिक्षक निवडणुकाRच्या कामाला लागले आहेत. आता ऐन परीक्षांच्या तोंडावर शिक्षक उपलब्ध होत नसल्याने परीक्षा कशा घ्यायच्या, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे.

परीक्षा कालावधीत शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची मागणी

4 मार्च ते 5 एप्रिल या कालावाधीत दहावी, बारावीच्या परीक्षा होणार आहेत. या कालावधीत निवडणूक कामासाठी गेलेल्या शिक्षकांना परीक्षांच्या पर्यवेक्षणासाठी कार्यमुक्त करावे, अशी मागणी शिक्षण निरीक्षक कार्यालयाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे करण्यात येणार आहे. त्यासाठी शाळांनी निवडणूक कामासाठी गेलेल्या सहाय्यक शिक्षकांची नावे पाठवावीत, अशा सूचना शाळांना दिल्या आहेत.

काही शिक्षक बीएलओ डय़ुटीसाठी तर काही एप्रिलमध्ये पार पडणाऱया मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी गेले आहेत. प्रत्येक शाळेतून 2 ते 4 शिक्षक निवडणुकीच्या कामातच गुंतले आहेत. हळूहळू ऑफलाईन शाळा सुरू होत असल्याने प्रत्यक्ष वर्गातही शिक्षकांची कमतरता भासत आहे. परीक्षा कालावधीत शिक्षकांना निवडणूक कामातून कार्यमुक्त केल्यास या निर्णयाचे स्वागतच आहे.

– सुभाष मोरे, कार्याध्यक्ष, शिक्षक भारती

परीक्षा कालावधी 

दहावी – 15 मार्च ते 4 एप्रिल

बारावी – 4 मार्च ते 30 मार्च

विद्यार्थीसंख्या

दहावी – 16 लाख 25 हजार 311

 बारावी – 14 लाख 72 हजार 562

परीक्षा केंद्रांची वाढलेली संख्या 

दहावी : आधी          5042

            नंतर      21,349

बारावी :    आधी          2943

            नंतर 9613