…म्हणून यशस्वी थांबला

मुंबईकर यशस्वी जैसवाल संघातील एका ज्येष्ठ खेळाडूशी झालेल्या कथित वादामुळे क्रिकेटसाठी गोवेकर होण्याचा मार्ग निवडला होता, पण तेव्हा हिंदुस्थानचा माजी कसोटी कर्णधार रोहित शर्माने त्याला मुंबईतच खेळण्याचा सल्ला दिला होता, त्यामुळेच त्याने मुंबईमध्येच थांबण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासा मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी केला आहे. यशस्वी जैसवालने यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला एमसीएकडून नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेत गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता, मात्र नंतर त्याने आश्चर्यजनकपणे आपला निर्णय बदलत पुन्हा मुंबई संघातच खेळण्याचा निर्धार केला.

या निर्णयामागे रोहित शर्माची भूमिका निर्णायक ठरल्याचे एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी उघड केले आहे. कारकीर्दीच्या या टप्प्यावर यशस्वीने मुंबई संघातच राहणे योग्य ठरेल, असे रोहितने यशस्वीला स्पष्ट सांगितले होते. मुंबईसारख्या संघाकडून खेळणे हे एक अभिमानाची आणि प्रतिष्ठsची गोष्ट आहे.