कॅमेऱ्याला मादी समजला नर ड्रॅगन…नंतर काय झाले…वाचा सविस्तर

3533

वन्य प्राणी आणि जंगलातील इतर प्राण्यांबाबत माहिती देणाऱ्या वाहिन्या लोकप्रिय आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना वन्य प्राण्यांबाबत वेगळी आणि नवीन माहिती देण्याचा प्रत्येक वाहिनीचा प्रयत्न असतो. त्यासाठी वन्य जीवांच्या हालचाली टिपण्यासाठी विविध युक्ती वापारून कॅमेरे ठिकठिकाणी बसवले जातात. मात्र, एका वाहिनीला त्यांनी वापरलेली युक्ती महागात पडली आहे. या शोसाठी लावण्यात आलेल्या कॅमेऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. असे काही घडेल याचा अंदाज निर्मात्यांना नव्हता. या घटनेमुळे आम्हाला वेगळा अनुभव मिळाल्याचे निर्मात्यांनी सांगितले.

या वाइल्ड शोसाठी कोमोडो ड्रॅमन या पालीच्या वेगळ्या प्रजातीवर विषेश भाग बनवण्यासाठी चित्रीकरण सुरू होते. या प्रजातींच्या हालचाली टिपण्याचे आव्हान निमिर्ती पथकासमोर होते. या प्रजातीच्या हालचाली टिपण्यासाठी या प्रजातीचे भक्ष्य असणारे डुक्कर आणि मादी ड्रॅगनची प्रतिकृती बनवण्यात आली. त्या प्रतिकृतींमध्ये हाय डिझॉल्युशनचे महागडे कॅमेरे बसवण्यात आले होते. ड्रॅगन या प्रतिकृतीजवळ आल्यावर कॅमेऱ्यातून त्यांच्या प्रत्येक हालाचाली टिपण्यात येणार होत्या. त्यानंतर निर्मिती पथकाची खरी कसोटी सुरू झाली. सर्व तयारी करून ड्रॅगन प्रतिकृतीजवळ येण्याची वाट पथक बघत होते. त्यानंतर ड्रॅगन मादी प्रतिकृतीजवळ आला. या प्रतिकृतीला तो मादी समजला आणि तिला आकर्षिक करण्याचे प्रयत्न करू लागला. प्रतिकृतीकडून कोणताच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे ड्रॅगनला मादीची संमती आहे असे वाटले आणि तो संभोगासाठी तिच्याकडे गेला. अनेकदा तो प्रतिकृतीशी छेडछाड करत होता. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्याचा राग अनावर झाला. त्याने त्याच्या टोकदार पंज्यांमध्ये प्रतिकृतीची मान पकडली. त्यानंतर घडत असलेल्या घटना ड्रॅगनला समजत नसल्याने तो पुरता भांबावला आणि त्या प्रतिकृतीची नासधूस करण्यास त्याने सुरूवात केली. ड्रॅगन नर आक्रमक झाल्याचे पाहून निर्मिती पथकाला काय करावे हे सूचत नव्हते. लांब बसून परिस्थिती नियंत्रणात आणणे शक्य नसल्याने पुढे काय होते, ते बघण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा कोणताच पर्याय नव्हता.

नर ड्रॅगन आक्रमक झाल्याने त्याने त्याच्या पंजाने पूर्ण प्रतिकृती तोडून टाकली. त्यात बसवलेले महागडे कॅमेरे नष्ट केले. तो आक्रमक झाल्याने आता काहीही करू शकतो, याचा अंदाज आम्हाला आला होता. मात्र, ड्रॅगनच्या हालचाली टिपण्यासाठी केलेली युक्ती अंगलट आल्याचे आमच्या लक्षात आले. मात्र, आता घडणाऱ्या कोणत्याही गोष्टीत हस्तक्षेप करणे शक्य नव्हते, असे शो चे निर्माते जॉन डाऊनर यांनी सांगितले. मादीकडून अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्याने आक्रमक झालेला ड्रॅगन आता भक्ष्य म्हणजे डुक्कराच्या प्रतिकृतीकडे वळला. तिथेही त्याला तसाच अनुभव आल्याने त्याने त्या प्रतिकृतीचेही नुकसान करून त्यातील कॅमेऱ्याची मोडतोड केली. आम्ही या सर्व गोष्टी चुकीच्या वेळी केल्याचे आमच्या लक्षात आले. हा हंगाम ड्रॅगनच्या प्रजननाचा असतो. त्यामुळे मादीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने नर ड्रॅगन आक्रमक झाला आणि त्याने आमचे सर्व कॅमेरे नष्ट केले. हे बघताना सर्व अविश्वसनीय वाटत होते. मात्र, या गोष्टी प्रत्यक्षात घडत होत्या. ड्रॅगनसारखा वन्य जीवही आक्रमक झाल्यावर डायनोसॉरसारखे वागू शकतो, याचा अनुभव आम्ही घेतल्याचे डाऊनर यांनी सांगितले. या चित्रीकरणात आमचे नुकसान झाले असले तरी आम्ही खूप काही शिकलो आहोत, असे डाऊनर म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या