
अकोला (शिवणी) विमानतळाच्या प्रलंबित समस्यासह राज्यातील इतरही विमानतळाच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी लककरच संबंधित लोकप्रतिनिधींसह अधिकार्यांची बैठक घेऊन राज्यातील विमानतळांना सर्व सोयीसुविधा पुरविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत दिली.
विधान परिषदेतील शिवसेनेचे सदस्य गोपिकिसन बजोरिया या अकोला (शिवणी) विमानतळाच्या विस्तारित धावपट्टीचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. धावपट्टी वाढवून देण्याची शिफारसदेखील करण्यात आल्याची लक्षवेधी मांडली.
या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, अकोला (शिकणी) विमानतळाची धावपट्टी, जमिनीचे भूसंपादन व इतर प्रलंबित प्रश्नांची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. यासंदर्भात सर्व संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकार्यांची बैठक घेऊन हा प्रश्न तातडीने सोडकिण्यात येईल.
चिपी विमानतळाकरून लवकरच विमाने उडणार
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र त्यानंतर या विमानतळाकरून एकही विमान उडाले नाही. हे विमानतळ कधी सुरू करणार, असा प्रश्न सदस्य रवींद्र फाटक यांनी उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, जनतेसाठी विमानसेवेकरिता सर्व सोयीसुकिधा उपलब्ध करून दिल्या जातील. लवकरच चिपी विमानतळाकरुन विमाने उडतील असे सांगितले.
दिल्लीला जायची गरज नाही
या विमानतळासंदर्भात सदस्य डॉ. रणजित पाटील यांनी जमिनीचे संपादन केल्यानंतरही धावपट्टी वाढविण्याच्या परवानगीसाठी दिल्ली येथे भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे जावे लागेल असे सांगितले. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले धावपट्टी वाढविण्याच्या परवानगीसाठी दिल्लीला जाण्याची गरज लागणार नाही. भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि विमानतळ विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त बैठकीतच हा निर्णय घेतला जाईल.































































