विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतरही ‘इंडिया आघाडी’सोबत ज्याण्यास इच्छूक; प्रकाश आंबेडकरांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल रविवारी झाहीर झाला. यामध्ये मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यात भाजपला बहुमत मिळाले. तर तेलंगणामध्ये काँग्रेसनं बाजी मारली. यानंतर ‘इंडिया आघाडी’वरून विविध चर्चांना उधाण आलं आहे. यासंदर्भातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी अगदी स्पष्ट शब्दात उत्तरं दिली.

चार राज्यांच्या निकालानंतर तुम्ही ‘इंडिया आघाडी’ किंवा काँग्रेसबरोबर जाण्यास इच्छुक आहात का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘आम्ही तर अगोदरपासून इंडिया आघाडीत जाण्यास इच्छूक आहोत. पण, आम्हाला घेण्यास कुणी तयार नाही, हेही आम्हाला कळत आहे. तरीही आम्ही इंडिया आघाडीबरोबर जाण्यास तयार आहोत’.

चार राज्यांच्या निकालाचं विश्लेषण करण्यास अजूनही वेळ आहे. भाजपाचा विजय झाला, हे निश्चित आहे. पण, भाजपाच्या विजयाचे बारकावे निवडणूक आयोगाने माहिती दिल्यानंतर करता येईल, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी त्यावर फारसं बोलण्याचं टाळलं.