विम्बल्डन विस्तार योजनेवर न्यायालयीन सुनावणी

जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठत ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा असलेल्या विम्बल्डनच्या मैदान विस्ताराच्या प्रस्तावावर पुन्हा एकदा न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. 1877 पासून ही स्पर्धा आयोजित करणारी ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लब ही संस्था आपल्या मुख्य परिसराचा आकार वाढवण्याचा विचार करत आहे.

या प्रस्तावित योजनेअंतर्गत सुमारे 200 दशलक्ष पौंडांचा प्रकल्प राबवण्यात येणार असून, त्यामध्ये 39 नवीन टेनिस कोर्ट उभारण्याचा समावेश आहे. ऑल इंग्लंडकडे असलेल्या गोल्फ कोर्सच्या जागेवर हा विकास करण्यात येणार आहे. या योजनेला काही नामवंत टेनिसपटू तसेच स्थानिक रहिवाशांचा पाठिंबा आहे. मात्र या स्थानिक अभियान गटाने या प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शवला आहे. त्यांच्या मते, संबंधित जमीन कायद्याने सार्वजनिक विरंगुळ्यासाठी राखीव असून तिचा पुनर्विकास करता येणार नाही. या मुद्दय़ावरून त्यांनी या विस्ताराच्या परवानगीविरोधात कायदेशीर आव्हान उभे केले आहे.

ऑल इंग्लंडने लंडन उच्च न्यायालयाकडे विनंती केली आहे की, ही जमीन अशा कोणत्याही कायदेशीर ट्रस्टअंतर्गत येत नाही, कारण तिचा सार्वजनिक वापर कधीही झाला नसल्याचा दावा संस्थेने केला आहे. या योजनेवर याआधीही कायदेशीर प्रक्रिया झाली होती. 2024 मध्ये ने दिलेल्या नियोजन परवानगीला ग्रेटर लंडन प्राधिकरणाने आव्हान दिले होते. त्यावेळी त्यांचा दावा फेटाळण्यात आला असला तरी आता त्यांना त्या निर्णयाविरोधात अपील करण्याची परवानगी मिळाली आहे. दरम्यान, सुनावणीदरम्यान काही समर्थकांनी शांततापूर्ण निदर्शनेही केली. आता न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले असून विम्बल्डनच्या विस्ताराचा पुढील मार्ग त्या निकालावर अवलंबून असणार आहे.