मायक्रोसॉफ्टची मोठी घोषणा; ऑक्टोबरपासून  विंडोज 11 येतंय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मायक्रोसॉफ्टचे विंडोज 11 येत्या 5 ऑक्टोबर रोजी येणार  आहे. युजर्ससाठी आनंदाची गोष्ट म्हणजे विंडोज 11 विनामूल्य अपग्रेड आहे. विंडो 10 चे युजर्स ते मोफत अपग्रेड करू शकतात. ते मायक्रोसॉफ्ट कंपनीतर्फे टप्प्याटप्प्याने रिलीज होऊ शकते. सुरुवातीला नवीन हार्डवेअर असलेल्या विंडोज 10 संगणकांना त्याचे अपग्रेड मिळेल. यानंतर कंपनी आपली व्याप्ती वाढवेल.

 मूळ विंडोज ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या युजर्सला (पायरेटेड नव्हे) विंडोज 11 उपलब्ध असेल. 2022 च्या मध्यापर्यंत सर्व पात्र उपकरणांमध्ये विंडोज 11 उपलब्ध होईल, अशी अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे. विंडोज 10 कॉम्प्युटर वापरणाऱयांना 5 ऑक्टोबरनंतर कधीही याची सूचना मिळू शकते. कॉम्प्युटर अपडेट सेटिंगमध्ये जाऊन युजर्सला ते मॅन्युअली तपासता येईल.