
’स्वच्छता’ या विषयावर चेंबूर येथील पल्लवी फाऊंडेशन आणि इंडियल ऑईल कॉर्पेरेशनच्यावतीने एकपात्री अभिनय काव्यवाचन आणि अध्यापन या स्वरुपाच्या अभिनव ऑनलाईन स्पर्धा घेतल्या होत्या. एकपात्री अभिनय स्पर्धेत वरळीच्या सखी गुंड्येने बाजी मारली आहे. काव्यवाचन ऑनलाईन स्पर्धेत ताडदेवच्या शुभम भालेकर यांनी तर अध्यापन ऑनलाईन स्पर्धेत जोगेश्वरीच्या प्रमोद महाडिक यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे.
पल्लवी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित या स्पर्धेत राज्यभरातील 249 स्पर्धक सहभागी झाले होते. एकपात्री अभिनय स्पर्धेत दुसरा आणि तिसरा क्रमांक अनुक्रमे सुमित सारंग (आसनगाव) आणि श्रद्धा कराणे (कामोठे) यांनी पटकावला. मिनाक्षी गायकवाड (नगर) आणि सुजाता उपारे (कांदिवली) हे काव्यवाचन स्पर्धेचे द्वितीय आणि तृतीय विजेते ठरले. अध्यापन ऑनलाईन स्पर्धेत कांचन गवस (लोअर परळ) आणि नाशिकच्या योगेश खालकर यांनी दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धेचे परिक्षण ज्येष्ठ रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर, ज्येष्ठ दिग्दर्शक विवेक देशपांडे, भालचंद्र दळवी, प्रमोद मोरजकर यांनी केले. या स्पर्धांना राज्यभरातून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करतानाच फाऊंडेशनच्या अध्यक्षा शलाका कोरगावकर यांनी निकाल जाहीर केला.



























































