
विधिमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत घेण्यात येणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पाटोले यांच्या अध्यक्षतेखालील विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबरला मुंबईत घेण्यात येणार. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष @NANA_PATOLE यांच्या अध्यक्षतेखालील विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय. pic.twitter.com/KToYzfNfHc
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 3, 2020
या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, , विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, , विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाल, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज मंत्री अनिल परब उपस्थित होते.

































































