
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसावंगी शिवारातील लांडग्याच्या हल्ल्यात 8 बकऱ्य़ा ठार झाल्या आहेत. शेतकरी अशोक कालुबा गवळी या शेतकऱ्य़ाच्या शेतातील गोठ्यातील 8 बकऱ्य़ा 22 डिसेंबर रोजी रात्री 4 वाजेच्या सुमारास वन्यप्राणी लांडग्याच्या हल्ल्याने आठ बकऱ्य़ांना ठार केले आहे.
घटनास्थळी वन कर्मचारी तथा वनरक्षक योगेश डोमळे व वनपाल व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. शेतकरी अशोक गवळी यांच्या आठ बकऱ्य़ा मृत्युमुखी पडल्या असुन सुमारे 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे वनरक्षक योगेश डोमळे यांनी माहिती दिली आहे. दरम्यान संबंधीत शेतकऱ्य़ांना वनविभागाच्या कार्यालयाला अहवाल दिल्यानंतर लगेच मदत मिळेल, असेही वनविभागाच्या अधिकाऱ्य़ांनी सांगितले.































































