भयंकर! मूल होत नाही म्हणून बायकोच्या गुप्तांगात मिरचीपूड टाकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । उन्नाव

मूल होत नाही म्हणून बायकोच्या छळ करणाऱ्या एका नराधम पतीने तिच्या गुप्तांगात मिरचीपूड टाकली आहे. उत्तर प्रदेश येथील उन्नाव येथे ही घटना घडली असून महिलेने नवऱ्यासह सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार केली आहे.

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ही महिला मूळची उन्नावची रहिवासी आहे. तिचं लग्न कोतवाली येथे राहणाऱ्या माणसाशी झालं होतं. लग्न होऊन बरीच वर्षं होऊनही त्यांना मूल नव्हतं. त्यामुळे नवरा आणि सासरकडची मंडळी तिचा छळ करत होते. दोन वर्षांपूर्वी त्यांचं कुटुंब लुधियाना इथे राहण्यास गेलं. मात्र, तिथेही त्यांचा छळ सुरूच होता. एक दिवशी तिच्या नवऱ्याने तिला विवस्त्र करून पट्ट्याने मारहाण केली. तिचे केसही कापले. इतक्यावरच त्याचा राग शांत झाला नाही. त्याने तिच्या गुप्तांगात मीठ आणि मिरचीपूड टाकली आणि तिला त्याच अवस्थेत घराबाहेर काढलं.

घराबाहेर काढल्यानंतर महिलेने वर्तमानपत्राच्या साहाय्याने अंग झाकलं आणि पोलिसांच्या मदतीने आपल्या माहेरी निघून आली. त्यानंतर उन्नाव पोलीस ठाण्यात तिने नवरा आणि सासू-सासऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे महिलेला नैराश्याचा झटका आला आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. सध्या महिलेचा पती आणि सासरकडची मंडळी फरार आहेत.

summary- woman got assaulted by husband