
हैदराबादमध्ये 13 व्या मजल्यावर राहात असलेल्या घरात शिरलेल्या चोरांनी चोरी केल्यानंतर प्रेशर कुकर महिलेच्या डोक्यात घालून महिलेची हत्या केली. यानंतर घरातील 40 ग्रॅम सोने, 1 लाख रुपये रोख रक्कम चोरून तेथून पोबारा केला. यामध्ये 50 वर्षीय रेणू अग्रवाल या महिलेचा मृत्यू झाला आहे.