पुण्यात वकील तरुणीवर मोटारीत अत्याचार, कोरेगाव पार्क परिसरातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Manipur Gang Rape Victim Passes Away After 2-Year Struggle for Life

घरी सोडण्याच्या बहाण्याने तरुणाने धावत्या मोटारीत एका वकिल  तरूणीवर अत्याचार केल्याची घटना रविवारी मध्यरात्री कोरेगाव पार्क-मुंढवा रस्त्यावर घडली. याप्रकरणी तिघाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अभिषेक नवनाथ मुकटे, धनंजय सोरटे, आदेश शिंदे यांना ताब्यात घेतले आहे. एका आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तक्रारदार तरुणी वकील असून, मूळची बिहारची आहे.  रविवारी रात्री ती मित्रांसोबत एका पबमध्ये बसली होती. तिचे मित्र पबमधून निघून गेल्यानंतर तिची आरोपीसोबत ओळख झाली. त्यानंतर आरोपीने तिला घरी सोडतो, असे सांगितले. त्याने तिला मोटारीतून नेऊन मुंढवा-कोरेगाव पार्क रस्त्याने मार्गक्रमण सुरू केले. दरम्यान, काही अंतरावर रस्ता निमर्नुष्य असलेल्या ठिकाणी त्याने कडेला मोटार उभी करून तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केला.

त्यानंतर इतर आरोपी त्याठिकाणी आले असता, तरुणी गाडीतून खाली उतरली. त्यानंतर मुख्य आरोपीने तरुणीचे साहित्य रस्त्यावर फेकून दिले. त्यानंतर दोन्ही मोटारीतील आरोपी पसार झाले. दरम्यान, तरुणीने घटनेची माहिती दुसऱ्या मित्राला देऊन त्याला बोलावून घेतले. त्यानंतर  रात्री उशिरा कोरेगाव पार्प पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली.