कौटुंबिक कारणावरून भांडण; महिलेच्या ओठाचा पाडला तुकडा

1006

कौटुंबिक कारणावरून झालेल्या भांडणात महिलेच्या ओठाचा चावा घेऊन तुकडा पाडल्याची धक्कादायक घटना पुण्यातील मोशी येथे रविवारी घडली. आम्रपाली सतीश दहातोंडे (वय 26) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. 6) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनिषा नागेश दहातोंडे (दोघीही रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) अरूण दगडू वाघमारे, चतुराबाई विक्रम सोनावणे (पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री बोऱ्हाडे वस्ती, मोशी येथे घडली. फिर्यादी यांच्या सासूने त्यांना किरणा माल भरून दिला. या कारणावरून चिडलेल्या आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांच्याशी भांडण केले. या भांडणात वाघमारे आणि सोनावणे यांनी फिर्यादी अम्रपाली यांना हाताने मारहाण केली. तसेच आरोपी मनिषा दहातोंडे हिने फिर्यादी आम्रपाली यांच्या ओठाचा चावा घेत त्याचा तुकडा पाडून गंभीर जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या