महिलेने टॉयलेटमध्ये फ्लश ओढलं, आत लपून बसले होते चार साप आणि मग…

सापाचं नाव ऐकताच भल्याभल्यांची भीतीने गाळण उडते. प्रत्यक्ष दिसला तर बघायलाच नको. असंच एका महिलेसोबत घडलं आहे. तिला एका वेळी एक नव्हे तर चार साप तिच्या टॉयलेटमध्ये दिसले.

सीएनएनने या संबंधीचं वृत्त दिलं आहे. सोफी पिअरसन नावाची महिला नॉर्थ क्विन्सलँड येथे राहते. गेल्या रविवारी ती तिच्या घरच्या टॉयलेटमध्ये गेली होती. तिथे तिने फ्लशचं बटण दाबलं. पण, ते दाबलं जात नव्हतं. त्यामुळे तिला काहीतरी गडबड असल्याची शंका आली. म्हणून तिने फ्लश टँक उघडून पाहिला.

त्या फ्लश टँकमध्ये एक नव्हे तर चार चार साप होते. ते पाहून तिने फ्लशचं झाकण बंद केलं. त्यानंतर तिने आपल्या एका मित्राला बोलावलं. तो सर्पमित्र होता. त्याने त्या टँकमधून साप पकडले आणि त्यांना जंगलात सोडून दिलं. यातला सर्वात मोठा साप 3 फूट 2 इंच इतका मोठा होता. सुदैवाने ते बिनविषारी होते. महिलेला आता हा प्रश्न पडला आहे की संपूर्णतः बंद असलेल्या टॉयलेट फ्लश टँकमध्ये हे साप नेमके कसे गेले असतील. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न ती करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या