गुंडाचा बदला घेण्यासाठी प्रेयसीच्या मैत्रिणीवर बलात्कार करून हत्या केली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

दिल्लीतील सरीता विहार भागात 27 फेब्रुवारीला एका तरूणीचा मृतदेह सापडला होता. पोलिसांना या हत्येचं कोडं उलगडण्यात यश आलं असून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. एका गुंडाने केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी   या चौघांनी निष्पाप तरूणीचा काहीही संबंध नसताना बलात्कार करून तिची हत्या केली.

तिहार जेलमध्ये धीरेंद्र आणि बंटी या दोन गुंडांमध्ये वाद झाला होता यामध्ये बंटीने धीरेंद्रला जबरदस्त हाणलं होतं. धीरेंद्र हा हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी आहे तर बंटी हा कुख्यात गुंड आहे. आपल्याला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्याचं धीरेंद्रने ठरवलं होतं. त्याने चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी दिनेशच्या मदतीने कट रचला. या दोघांनी बंटीचा लहान भाऊ आरूष याला बलात्काराच्या खोट्या आरोपात अडकवण्याचचं ठरवलं होतं. या कटामध्ये त्यांनी सौरभ भारद्वाज आणि चंद्रकेश नावाच्या आरोपीलाही सामील करून घेतलं.

दिनेशने त्याच्या प्रेयसीच्या मैत्रिणीला नोकरीला लावतो असं सांगून एका ठिकाणी बोलावलं. इथे त्यांनी आरूषने माझ्यावर बलात्कार केला आहे अशी चिठ्ठी लिहण्यास सांगितली. या बदल्यात तुला नोकरी लावून देतो असं दिनेश आणि धीरेंद्रने सांगितले. यानंतर या दोघांनी सौरभसोबत तिच्यावर बलात्कार केला आणि हत्या केली. यानंतर त्यांनी या तरूणीची हत्या केली. चंद्रकेश आणि त्याचा दुसरा एक साथीदार रहीमुद्दीन या दोघांनी या तरुणीचा मृतदेह गोणीत भरून फेकून दिला. पोलिसांनी या तरूणीचा मृतदेह सापडल्यानंतर सुरू केलेला तपास खऱ्या आरोपींपर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यांनी मुख्य आरोपी धीरेंद्र वगळता इतर सगळ्यांना अटक केली आहे. धीरेंद्र फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.