ट्रेलरची दुचाकीला धडक; महिला ठार, दोन महिन्यात 10 बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

बीड बायपास रस्त्यावरील सूर्या लॉन्स समोर ट्रेलरने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात वत्सलाबाई मच्छिंद्र काळे या जागीच ठार झाल्या. अंगावरून चाक गेल्यामुळे त्यांचा चेंदमेंदा झाला असून मृतदेह 20 फुटांपर्यंत फरफटत नेला. वऱ्हाडी मंडळींनी ट्रेलरचा पाठलाग करून दारुच्या नशेत तर्राट असेलेल्या चालकास पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या रस्त्यावर गेल्या दोन महिन्यातील दहावा बळी आहे.

बीड बायपास रस्त्यावरील नाईकनगरात राहणाऱ्या वत्सलाबाई मच्छिंद्र काळे हे आपल्या पती सोबत शहरात येण्यासाठी दुचाकीवरून निघाल्या होत्या. सूर्या लॉन समोर नागपूरहून पुणे कडे जाणारे ट्रेलर (एचएच 40 बीजी 805) चालकाचे नियंत्रण सुटले आणि पाठीमागून दुचाकीला धडक दिली. जोराच्या धडकेमुळे दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या वत्सलाबाई खाली कोसळल्या आणि त्या चाकाखाली सापडल्या. त्यांच्या अंगावरून चाक गेल्यामुळे त्याचा चेंदामेंदा झाला तर चालकाचे नियंत्रण सुटल्याने जवळपास 20 फुटापर्यत वत्सलाबाईला फरफटत नेले. अपघातानंतर लग्न समारंभासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळीने पाठलाग करून ट्रेलर चालकास पकडू चोप देत सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले.

दोन महिन्यात दहावा बळी
बीड बायपास रस्ता हा मृत्यूचा सापळा झाला असून या रस्त्यावर नियमीतपणे अपघात होऊ लागल्यामुळे पोलिसांनी या रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांचा वेग मोजण्याचे यंत्र पोलीस उपायुक्त वाहतुक डॉ. दिपाली घाडगे – धाटे यांनी बसविले मात्र काही दिवसानंतर ते यंत्र आणि वाहतूक पोलीस कर्मचारी या रस्त्यावरून हटविल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप्त केला जात आहे. गेल्या दोन महिन्यामध्ये अपघाताचा दहावा बळी गेला आहे.