मंगळसूत्र आणले नाही म्हणून विवाहितेचा खून; चिंचोलीतील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder

सामना ऑनलाईन । चिंचोली

माहेराहून पहिल्या पतीचे मंगळसूत्र आणण्यासाठी पतीसह सासरच्या लोकांनी चटके दिल्याने गंभीर जखमी झालेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सासरा व दिराला पोलिसांनी अटक केली आहे. देहूरोड चिंचोली येथील ही घटना असून मोनिका सोमनाथ जाधव असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मोनिकाचा पती सोमनाथ जाधव, सासू लक्ष्मीबाई जाधव, सासरे नारायण जाधव व दीर गणेश नारायण जाधव यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, सासरे नारायण, दीर गणेश याला अटक करण्यात आली आहे. याबाबत मोनिकाची आई शांता पोवार यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोनिकाचे सोमनाथ जाधव याच्याशी दुसरे लग्न झाले होते. माहेराहून पहिल्या पतीचे मंगळसूत्र आणण्यासाठी पती, सासू, सासरे हे मोनिकाला शारीरिक व मानसिक त्रास देत होते. सासरच्यांनी चटके देऊन मोनिकाला जखमी केले होते. गंभीर जखमी झालेल्या मोनिकाचा सोमवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात जखमामुळेच मोनिकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.