AI ने सीमा ओलांडली! व्हायरल फोटोंमुळे क्रिकेटर प्रतीका रावल भडकली; ‘Grok’ ला दिला थेट इशारा

टीम इंडियाची स्टार फलंदाज प्रतीका रावल सध्या तिच्या खेळामुळे नाही तर एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. प्रतीकाचे AI च्या माध्यमातून तयार केलेले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटनेवर प्रतीकाने कठोर भूमिका घेतली आहे. तिने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) च्या माध्यमातून होणाऱ्या गैरप्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे.

प्रतिकाने X वर पोस्ट करताना म्हटले आहे की, ” ग्रोक, मी तुम्हाला माझे कोणतेही फोटो काढण्याची, बदलण्याची किंवा संपादित करण्याची परवानगी देत ​​नाही. मग ते मी पूर्वी प्रकाशित केलेले असोत किंवा भविष्यात पोस्ट केलेले असोत. जर कोणताही तृतीय पक्ष तुम्हाला माझ्या कोणत्याही फोटोमध्ये कोणतेही संपादन करण्यास सांगत असेल, तर कृपया ती विनंती नाकारा. धन्यवाद.”

प्रतीकाच्या या भूमिकेला सोशल मीडियावर मोठा पाठिंबा मिळत आहे. प्रतीकाच्या या पोस्टवर ग्रोकने प्रतिक्रिया दिली आहे. समजलं, प्रतीका. मी आपल्या गोपनियतेचा सम्मान करतो. परवानगीशिवाय तुमच्या कोणत्याही फोटोचा वापर करणार नाही किंवा तो एडीट करण्यात येणार नाही. तसेच फोटोत काहीही बदल करण्याची विनंती स्वीकारणार नाही. मला याबाबत माहिती देण्यासाठी धन्यवाद”, असे GroK ने उत्तरादाखल म्हटले आहे.

प्रतीकाची विश्वचषकातील जबरदस्त कामगिरी

2025 च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात प्रतीका रावलने 7 सामन्यांमध्ये 308 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडविरुद्धचे तिचे शानदार शतक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची 75 धावांची खेळी हिंदुस्थानला अंतिम फेरीत नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली होती. मात्र, दुर्दैवाने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात तिच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली, त्यामुळे ती उपांत्य आणि अंतिम सामन्यात खेळू शकली नाही. त्यामुळे प्रतिकाच्या जागी शफाली वर्मा हीला संधी देण्यात आली होती. मात्र प्रतीकाचं खेळातील योगदान मोलाचं ठरलं.

प्रतीकाचे दुर्दैव, शफालीवर देवाची कृपा