
सामना ऑनलाईन, मुंबई
वेस्ट इंडीजमध्ये रंगणाऱया महिलांच्या ट्वेण्टी-20 वर्ल्ड कपला 9 नोव्हेंबरला सुरुवात होत असून यावेळी दहा संघांमध्ये जेतेपदाची झुंज पाहायला मिळणार आहे. हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्यामध्ये सलामीचा सामना रंगणार असून यावेळी साऱया जगातील क्रिकेटप्रेमींच्या नजरा खिळलेल्या हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यामधील लढत 11 नोव्हेंबरला होणार आहे.
ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक तीन वेळा ही स्पर्धा जिंकण्याची करामत केली असून इंग्लंड व वेस्ट इंडीज यांनी प्रत्येकी एक वेळा चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघ मैदानात उतरेल तो पहिल्यांदाच अजिंक्यपद मिळवण्यासाठीच. अनुभवी खेळाडू मिताली राजसाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. या स्पर्धेनंतर ती ट्वेण्टी-20तून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.
वेळापत्रक
- 9 नोव्हेंबर – हिंदुस्थान-न्यूझीलंड, रात्री 8.30वा.
- 10 नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान, मध्यरात्री 1.30 वा.
- 10 नोव्हेंबर – वेस्ट इंडीज-बांगलादेश, पहाटे 5.30 वा.
- 11 नोव्हेंबर – इंग्लंड-श्रीलंका, मध्यरात्री 1.30 वा.
- 11 नोव्हेंबर – हिंदुस्थान-पाकिस्तान, रात्री 8.30 वा.
- 12 नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया-आयर्लंड, मध्यरात्री 1.30 वा.
- 13 नोव्हेंबर – बांगलादेश-इंग्लंड, मध्यरात्री 1.30 वा.
- 13 नोव्हेंबर – दक्षिण आफ्रिका-श्रीलंका, पहाटे 5.30 वा.
- 14 नोव्हेंबर – पाकिस्तान-आयर्लंड, मध्यरात्री 1.30 वा.
- 14 नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड, पहाटे 5.30 वा.
- 15 नोव्हेंबर – बांगलादेश-श्रीलंका, मध्यरात्री 1.30 वा.
- 15 नोव्हेंबर – वेस्ट इंडीज-दक्षिण आफ्रिका, पहाटे 5.30वा.
- 15 नोव्हेंबर – हिंदुस्थान-आयर्लंड, रात्री 8.30 वा.
- 16 नोव्हेंबर – न्यूझीलंड-पाकिस्तान, मध्यरात्री 1.30 वा.
- 17 नोव्हेंबर – इंग्लंड-दक्षिण आफ्रिका, मध्यरात्री 1.30वा.
- 17 नोव्हेंबर – वेस्ट इंडीज-श्रीलंका, पहाटे 5.30 वा.
- 17 नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया-हिंदुस्थान, रात्री 8.30 वा.
- 18 नोव्हेंबर – आयर्लंड-न्यूझीलंड, मध्यरात्री 1.30 वा.
- 19 नोव्हेंबर – वेस्ट इंडीज-इंग्लंड, मध्यरात्री 1.30वा.
- 19 नोव्हेंबर – बांगलादेश-दक्षिण आफ्रिका, पहाटे 5.30वा.
- 23 नोव्हेंबर – पहिली उपांत्य लढत, मध्यरात्री 1.30 वा.
- 23 नोव्हेंबर – दुसरी उपांत्य लढत, पहाटे 5.30 वा.
- 25 नोव्हेंबर – अंतिम फेरी, पहाटे 5.30 वा.
‘अ’ गट-इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज, बांगलादेश
‘ब’ गट-हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, आयर्लंड






























































