नरेंद्र मोदी 2039 पर्यंत पंतप्रधानपदाचे उमेदवार राहणार, राजनाथ सिंह यांचे विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. भाजपमध्ये मोदींनीच आणलेल्या अलिखित नियमानुसार वयाची पन्चाहत्तरी पूर्ण झाल्यानंतर ते निवृत्त होणार आणि त्यांच्या जागी दुसऱ्या कुणाची तरी वर्णी लागणार अशी चर्चा सुरू होती. मात्र तसे काहीही झाले नाही. आता केंद्रीय संरत्रण मंत्री राजनाथ सिंह यांनीही यावर भाष्य करत मोदींच्या निवृत्तीच्या चर्चा फेटाळून लावत ते 2039 पर्यंत पंतप्रधान पदाचे उमेदवार राहतील असे सांगितले.

नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली 2029 आणि 2034 ची लोकसभा निवडणूक लढली जाईल, असे राजनाथ सिंह म्हणाले. पुढील 15 ते 20 वर्षांसाठी भाजपमध्ये पंतप्रधानपदासाठी कोणतीही जागा रिक्त नाही. नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान राहतील, असेही ते म्हणाले. ‘इंडिया टुडे‘ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी हे भाष्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार, काय बोलणार याकडे लक्ष