मुंबई उच्च न्यायालयासमोरील गटारात पडून कामगाराच्या मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

मुंबई उच्च न्यायालयाच्या गेट नं.-5 समोरील एका गटारात पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्या एका कामगारावर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या गेट नं.-5 च्या समोरील पाण्याच्या पाइपलाइनचे काम करण्यात येत आहे. या ठिकाणी खासगी कामगारांच्या माध्यमातून काम करीत असताना दोन कामगार थेट गटारात पडले. यामध्ये स्थानिकांनी तातडीने एकाला बाहेर काढले. त्याचे नाव सुकरकुमार सिंग (35) त्याच्यावर जीटी रुग्णालयात उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मात्र एकाचा शोध लागत नव्हता. अग्निशमन दलाने शोधमोहिमेत त्याला शोधून काढले. मात्र जेजे रुग्णालयात पाठवले असता पिंटू सिंग (34) याला डॉक्टरांनी मृत असल्याचे जाहीर केले.