ऊसदरासाठी कारखानदारांना ताकद दाखविण्याची गरज!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा जिह्यात साखर कारखानदारांकडून ऊस दराबाबत ऊस उत्पादक शेतकऱयांची गळचेपी केली जाते. स्वतःच्या फायद्यासाठी जिह्यातील सर्व कारखानदार एकत्र येत असतील, तर शेतकऱयांनीही ऊस दरासाठी एकत्र येऊन साखर कारखानदारांना आपली ताकद दाखविण्याची गरज असल्याचे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी कातरखटाव येथील सभेत केले.

राजू शेट्टी म्हणाले, ‘‘कोल्हापूर, सांगली जिह्यात 20-25 वर्षांपूर्वी उसाचे आंदोलन सुरू झाले. गावोगावी लोकांच्यात जागरूकता निर्माण केली. साखर सम्राटांकडून शेतकऱयांची होत असलेली पिळवणूक दाखवून दिली. त्यावेळी शेतकरी जागरूक झाले. आज या दोन्ही जिह्यांत उसाला तीन हजार रुपयांहून अधिक दर दिला जातो. मात्र, सातारा जिह्यात अडीच हजारांच्या आसपासच ऊस दर दिला जातो.’’