
चांगले शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध असतानाही गेल्या दहा वर्षांत नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या मोठय़ा प्रमाणात कमी झाली आहे. 2017-18 सालच्या लेबर फोर्स सर्व्हेमधून ही चिंताजनक बाब उघड झाली आहे.
लेबर फोर्सच्या अभ्यासानुसार फक्त 23 टक्के महिला कमावत्या आहेत. हे प्रमाण 2011-12 साली 31 टक्के तर 2004-05 साली 43 टक्के होते. वय, उत्पन्न यांच्या स्तरांवर महिलांमध्ये काम सोडण्याचा कल अधिक आहे. ग्रामीण महिलांची परिस्थिती आश्चर्यकारक आहे. ग्रामीण महिलांमध्ये नोकरीचे प्रमाण कमी झालेले नाही.
महिला काम का सोडून देतात
शिक्षण
सध्याच्या पिढाच्या मुली जास्त शिकल्या सवरलेल्या आहेत. त्यामुळे नोकरीबद्दल त्यांच्या अपेक्षा जास्त आहेत.
सामाजिक दबाव
समाजाचा अलिखित नियम आहे की घर चालवण्याएवढे उत्पन्न कुटुंबाचे असेल तर विवाहित महिलांनी कामासाठी बाहेर पडण्याऐवजी घरीच रहावे, कुटुंब सांभाळावे.
कामाच्या संधी
शेतीची कामे आता खूप आधुनिक पद्धतीने होतात. शेतात यंत्रांचा, आधुनिक साहित्याचा अधिक वापर केला जातो. बांधकाम आणि उत्पादन या क्षेत्रात महिला काम करीत आहेत. मात्र तिथे त्यांना नवीन संधी मिळत नाहीत. त्यामुळे त्यांची वाढ स्थिर दिसून येत आहे.
पुरुषांशी स्पर्धा
लेबर मार्केटमध्ये पुरुषांची मक्तेदारी आहे. असे अनेक क्षेत्र आहेत जिथे महिलांना स्पर्धेचे सामना करावा लागत आहे. प्रवासाची आणि राहण्याची गैरसोय बघून अनेक महिला घराबाहेर पडू शकत नाहीत, काम करू शकत नाहीत.

























































